शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

'असा' फसला लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये शिरणारा तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:46 IST

सुरक्षारक्षकाच्या चाणाक्षपणामुळे तरुणाला बेड्या

पुणे: लष्कराचा गणवेश घालून कमांड हॉस्पिटल परिसरात शिरणाऱ्या तरुणाला वानवडी पोलिसांनी अटक केली. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये आपली निवड झाल्याचं दाखवण्यासाठी या तरुणानं लष्कराचा गणवेश तयार करुन घेतल्याची माहिती चौकशीतून समोर आली. लष्करी वैद्यकीय विद्यार्थी असल्याचा बनाव करु पाहणाऱ्या या तरुणाला सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे अटक झाली.आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये निवड झाल्याचं दाखवण्यासाठी सय्यद जुनेद सय्यद अख्तर नावाच्या तरुणानं लष्कराचा गणवेश शिवून घेतला. 20 वर्षांचा जुनेद हा भुसावळचा रहिवासी आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला, हे कुटुंबांना दाखवण्यासाठी त्यानं खोट्या शिक्क्यांच्या मदतीनं कागदपत्रं तयार केली. यानंतर त्यानं लष्करी विद्यार्थ्यांसारखा गणवेशदेखील शिवला. मात्र खांद्यावरची फित आणि पायातले बूट विद्यार्थ्यांशी जुळणारे नव्हते. नेमकी हीच बाब कमांड हॉस्पिटलच्या दरवाज्यावरील सुरक्षारक्षकानं हेरली आणि त्यानं सय्यदची चौकशी केली. त्याच्याकडे खोटी कागदपत्रं आढळल्यानं त्यानं याबद्दलची माहिती वानवडी पोलिसांना दिली. चौकशीदरम्यान सय्यदकडे बोगस कागदपत्रं आणि ओळखपत्र आढळून आलं. सय्यद बारावी पास आहे. आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असल्याचं भासवण्यासाठी त्यानं हा सर्व उपद्वाप केल्याची माहिती चौकशीतून समोर आली. प्रवेशद्वारावर सय्यदला अडवणाऱ्या सुरक्षारक्षकानं याची माहिती वानवडी पोलिसांना दिली. यानंतर वनवाडी पोलिसांनी सय्यदला अटक केली. सय्यद दोनच दिवसांपूर्वी भुसावळहून पुण्याला आला. त्यानं आपलं सामान पुणे स्टेशनवरील क्लॉक रुममध्ये ठेवलं होतं. आपण एएफएमसीचे विद्यार्थी असल्याचं दाखवण्यासाठी तो सोमवारी सायंकाळी कमांड हॉस्पिटलमध्ये जात होता. त्यावेळी प्रवेशद्नारावरील सुरक्षा रक्षकाला संशय आल्याने त्यांनी हटकलं. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला काहीच सांगता येत नव्हतं. त्यामुळे लष्कर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPuneपुणेArrestअटक