वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:11 IST2021-09-27T04:11:24+5:302021-09-27T04:11:24+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २५) पुणे-नगर मार्गावर हा युवक दुचाकीने जात होता. यावेळी ...

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढापुरी (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २५) पुणे-नगर मार्गावर हा युवक दुचाकीने जात होता. यावेळी एका भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी कोंढापुरीचे पोलीस पाटील राजेश गायकवाड यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मृत युवकाचे वय अंदाजे २५ वर्षे आहे. अंगावर राखाटी रंगाचा काळे ठिपके असलेला शर्ट व काळ्या रंगाची पँट, काळे केस, उभट चेहरा असे युवकाचे वर्णन आहे. या युवकाबद्दल कुणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.