पुलावरून उडी मारून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:13 IST2021-03-17T04:13:14+5:302021-03-17T04:13:14+5:30
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंदाजे 35 वर्षाचा एक युवक डॉ. आंबेडकर सेतूवरून येरवडयाच्या दिशेने पायी चालला होता. अचानक ...

पुलावरून उडी मारून युवकाची आत्महत्या
मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंदाजे 35 वर्षाचा एक युवक डॉ. आंबेडकर सेतूवरून येरवडयाच्या दिशेने पायी चालला होता. अचानक पुलाच्या मध्यभागी आल्यावर त्याने नदीपात्रात उडी घेतली. ही घटना त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने बघितली. त्याने तात्काळ या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली. नदीपात्रातून थोड्याच अंतरावर वाहत जात नवीन मेट्रोच्या पुलाखाली एका खडकालगत त्याचा मृतदेह अडकून तरंगत होता. येरवडा अग्निशमन दलाचे तांडेल महेश मुळीक, मिलिंद रावतू, रोहिदास टिंगरे, चालक गणेश पराते यांच्या पथकाने नदीपात्रात उतरून दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता त्याची ओळख पटू शकलेली नाही. त्याच्या खिशात केवळ एक साधा मोबाईल सापडला असून त्याच्या डाव्या हातावर इंग्रजी S तर उजव्या हातावर डमरूचे चित्र गोंदलेले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत. दरम्यान नदीपात्रात उडी मारलेल्या अनोळखी तरुणाला पाहण्यासाठी डॉ.आंबेडकर सेतूवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.