खडकवासला येथे युवकाला पिस्तुलासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:12+5:302021-07-15T04:09:12+5:30
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार: बुधवारी (१४ जुलै) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे ...

खडकवासला येथे युवकाला पिस्तुलासह अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार: बुधवारी (१४ जुलै) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी देवालेश साळुंके हा धरण चौक खडकवासला येथे आला असून, त्याच्या कमरेला पिस्तूलसारखे खोचले आहे. अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस हवालदार विजय कांचन, चंद्रकांत जाधव, अमोल शेडगे, मंगेश कदम, धीरज जाधव, पूनम गुंड व दगडू विरकर हे पोहोचले त्या वेळी तेथे साळुंखे हा संशयास्पदरीत्या थांबलेला दिसला. तसेच त्याच्या कमरेला पिस्तूल सारखे हत्यार खोचलेले दिसले. म्हणून पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तूल व पॅन्टच्या उजव्या खिशात १ जिवंत काडतूस सापडले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.