शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:53 IST

दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला नारायणगाव पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने जेरबंद केले...

नारायणगाव (पुणे) : नारायणगाव येथील हॉटेल गॅलेक्सी समोर देशी बनावटीच्या पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला नारायणगाव पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने जेरबंद केले आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. पवन दत्तात्रय शेजवळ (वय ३७), रा. शिव-विहार सोसायटी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे यास पोलिसांनी अटक केली आहे.

नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीत हॉटेल गॅलेक्सीसमोर नारायणगाव जुन्नर रोडवर पवन शेजवळ हा आपल्या कब्जातील गावठी बनावटीचे पिस्तूल दाखवून दहशत निर्माण करत आहे, अशी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सनील धनवे, पो. कॉ. सचिन सातपुते, पो.ना. मंगेश लोखंडे, पो. कॉ. हासे स्था.गु. शा. पुणे ग्रामीणचे पो.हवा. दीपक साबळे, पो.ना. संदीप वारे, पो. कॉ. अक्षय नवले यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन खात्री केली असता शेजवळ हा आपल्या कब्जातील गावठी बनावटीचे एक पिस्तूल विनापरवाना बेकायदा बाळगून नागरिकांना धाक दाखवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसल्याने पोलिस स्टाफने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पुढील तपास पोहवा रमेश काठे करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड