विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:18+5:302021-07-10T04:09:18+5:30
लोणी काळभोर : गुन्हे शोध पथकाने विनापरवाना, बेकायदा कमरेला गावठी पिस्तूल बाळगून फिरत असलेल्या तरुणास अटक केली. त्याच्याकडून ...

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
लोणी काळभोर : गुन्हे शोध पथकाने विनापरवाना, बेकायदा कमरेला गावठी पिस्तूल बाळगून फिरत असलेल्या तरुणास अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आले आहे.
गणेश बाळासाहेब बधे (वय २०, रा. गणेशनगर, उरुळी देवाची, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. ९) गुुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे निखिल परशुराम पवार, अमित साळुखे, नागलोत, वीर यांचेसमवेत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आरोपींचा शोध घेत उरुळी देवाची गाव हद्दीत गस्त घालत होते. या वेळी एक तरुण कबंरेला पिस्तूल लाऊन फिरत असल्याची माहिती त्यांना बातमीदारामार्फत मिळाली. तो तरुण उरूळी देवाची येथील सह्याद्री चौक येथे येणार असल्याचे कळाले. पोलिसांनी सापळा रचून १.३० च्या सुमारास त्याला अटक केली. त्याची झडती घेतली असल्यास त्याच्या खिशातून पिस्तूल व काडतूस सापडले.