शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘आपली माती, आपली माणसं’ पुरवणीचे थाटात प्रकाशन

By admin | Updated: March 24, 2015 23:17 IST

लोकमत मुळशी तालुक्याच्या ‘आपली माती, आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन मुळशी पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात झाले.

पुणे : लोकमत मुळशी तालुक्याच्या ‘आपली माती, आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन मुळशी पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात झाले. या वेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रांसह वाचकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या पुरवणीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सभापती रवींद्र कंधारे, गटविकास अधिकारी शालिनी कडू, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चांदेरे, हिंजवडीचे सरपंच श्यामराव हुलावळे, माजी सभापती लक्ष्मीबाई सातपुते, मुळशी तालुका काँगे्रसच्या महिला अध्यक्षा कांताबाई पांढरे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते गंगाराम मातेरे, साक्षी लॉनचे डायरेक्टर प्रमोद मांडेकर, झील स्कुलचे संस्थापक विक्रांत वाल्हेकर, संजय दुधाणे या वेळी उपस्थित होते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शालिनी कडू म्हणाल्या, ‘‘व्हिजन २०२० प्रमाणे मुळशी तालुक्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन ‘२०-२० मुळशी तालुका’ हे मॉडेल ठरवून भविष्यात यावर विशेषांक काढण्यात यावा. तालुक्याचा विकास साधताना हा अंक पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना फायदेशीर ठरेल. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या या उपक्रमाला संपूर्ण राज्यातून प्रतिसाद मिळेल.’’ विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘लोकमतने नेहमीच आपल्या कृतीतून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. ‘आपली माती, आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन मुळशीतून होत आहे. ज्याप्रमाणे मुळशीकरांनी या पुरवणीला प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यातूनही या पुरवणीला प्रतिसाद मिळेल.’’ लोकमतमधून भविष्यात मुळशीकरांच्या समस्या प्राधान्यांने मांडण्यात येईल, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. बाळासाहेब चांदेरे म्हणाले, ‘‘तालुक्याला मोठा इतिहास आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तालुक्याच्या परंपरेचा उलगडा व्हावा म्हणून अनेक सामाजिक संस्था तसेच पत्रकारांनी प्रयत्न केले आहेत.’’जि. प. गटनेते शांताराम इंगवले, जि. प. माजी सदस्य सुभाष अमराळे, आत्माराम कलाट, पंचायत समिती माजी उपसभापती व विद्यमान सदस्य महादेव कोंढरे यांनी या पुरवणीचे विशेष कौतुक केले.यावेळी भाजपा मुळशी तालुकाध्यक्ष सचिन सदावर्ते, पं. स. मुळशीचे माजी सदस्य दत्तात्रय सुर्वे, विनायक ठोंबरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुरपे, भूगावचे सरपंच विजय सातपुते, सदस्य बाळासाहेब शेडगे, सदस्य विजय मिरघे, दगडू काका करंजावने, पिरंगुट ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पवळे, पौडचे माजी सरपंच विनायक गुजर, दीपक सोनवणे, अवधूत बाप्ते, सचिन आकरे, किसन बाणेकर, ज्ञानेश्वर डफळ, शकुंतला सुर्वे, मुळशी तालुका महिला आघाडी भाजपा अध्यक्षा ज्योती वाघवले, उपाध्यक्षा वैशाली बाणेकर, भाजपा तालुका किसान सेलचे विलास चोधे, झील स्कूलचे व्यवस्थापक अनिल चोंधे, अशोक साठे, शांता जोरी, रमेश अग्रवाल, लोकमतचे ताम्हिणीचे वार्ताहर राजेश गायकवाड, कृष्णा नेमाडे, नीलिमा मांडेकर, युवराज ढोरे आदी उपस्थित होते. अरविंद कुडापणे यांनी ‘आपली माती, आपली माणसं’चा लोगो काढून रांगोळीची विशेष सजावट केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक सोनवणे, अवधूत बाप्ते, सचिन आकरे, संतोष केसवड, किशोर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.लोकमतचे मुळशी तालुका वार्ताहर प्रदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. भाऊ मरगळे यांनी सूत्रसंचालन केले. संजय दुधाणे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)मुळशीच्या राजकीय वाटचालीत राजकीय मंडळींना लोकमत सातत्याने मार्गदर्शक राहिलेला आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाचीही लोकमतकडून नेहमीच दखल घेतल्यामुळे पुढील कामास बळ मिळते. लोकमतने या पुरवणीच्या निमित्ताने तालुक्यातील विविध क्षेत्रांत विशेष काम करणाऱ्या व्यक्तींची घेतलेली दखल निश्चितच कौतुकास्पद आहे.- रवींद्र कंधारे, सभापतीलोकमतने ‘आपली माती, आपली माणसं’ या पुरवणीच्या माध्यमातून तालुक्याची प्रसिद्ध केलेली माहिती वाखाण्यासारखी आहे. लोकमतमध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांमुळे आज लोकमतचा तालुक्यात मोठा वाचक आहे. मुळशीकरांनी कायम मदत लोकमतला केली आहे. यापुढेही हे सहकार्य कायम राहील.- बाळासाहेब चांदेरे, सदस्य, पंचायत समिती