टेम्पोखाली सापडून तरुण जागीच ठार
By Admin | Updated: August 23, 2015 04:14 IST2015-08-23T04:14:18+5:302015-08-23T04:14:18+5:30
यवत येथे भरधाव टेम्पो पलटी झाला. या गाडीखाली सापडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि. २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर घडला.

टेम्पोखाली सापडून तरुण जागीच ठार
यवत : यवत येथे भरधाव टेम्पो पलटी झाला. या गाडीखाली सापडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (दि. २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर घडला.
गणेश दिलीप चौखंडे (वय २७, यवत) असे मृत तरुणाचे नाव आहे. सलीम रशीद सय्यद व आतिश आत्माराम पाबळे (दोघेही रा. यवत, ता. दौड) हे जखमी झाले आहेत.
मालवाहतूक करणारा टेम्पो (एमएच ०५-एएम ५४१४) भरधाव वेगाने सोलापूर बाजूकडे जात होता. भुलेश्वर फाट्यानाजीक चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटून सेवा रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या वेळी सेवा रस्त्याच्या बाजूला गणेश चौखंडे हे त्यांची दुचाकी (एमएच ४२-एन ४०५६) थांबवून काही मित्रांबरोबर बोलत होते. अचानक हा टेम्पो त्यांच्या अंगावर पलटी झाला. बाजूला उभा असलेल्या छोट्या मालवाहक टेम्पोचेदेखील नुकसान झाले.
नागरिकांनी ट्रॅक्टर व जेसीबी मशीनच्या साह्याने पलटी झालेला टेम्पो हटवला. मात्र, गणेश यांच्या शरीराचा चेंदामेंदा झालेला होता. जखमींना तातडीने यवत येथील खासगी रुग्णालयात मध्ये हलविण्यात आले. पोलीस नंदकुमार लोणकर पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)