तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:05+5:302021-09-02T04:25:05+5:30

आळेफाटा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार बेल्हा, यादववाडी येथे राहत असलेले दत्तात्रय पिंगळे आज पहाटेच्या सुमारास उठले असता त्यांना त्यांची ...

Young woman commits suicide by jumping into a well | तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या

आळेफाटा पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार बेल्हा, यादववाडी येथे राहत असलेले दत्तात्रय पिंगळे आज पहाटेच्या सुमारास उठले असता त्यांना त्यांची मुलगी प्राची दत्तात्रय पिंगळे (वय २१) ही घरात न दिसल्याने त्यांनी बाहेर जाऊन अनेक ठिकाणी मुलीचा शोध घेतला तसेच बऱ्याच ठिकाणी फोन केला तरीही तिचा शोध लागला नाही. शेवटी त्यांना मुलगी भेटली नसल्याने घराजवळच काही फुटाच्या अंतरावर असलेल्या विहिरीजवळ जाऊन पाहिले असता त्यांना विहिरीत चप्पल तरंगताना दिसली व संशय आल्याने त्यांनी याबाबत बेल्हा पोलीस स्टेशनला कळवले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी येऊन माहिती घेतली व त्या विहिरीत मृतदेह दिसून आला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलिसांनी या मुलीची मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. तपास आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित पोळ हे करत आहे.

Web Title: Young woman commits suicide by jumping into a well