शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

पोलीस रेड... सहा नर्तिकांसोबत तरुणांचा मध्यरात्रीपर्यंत अश्लील नाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 13:23 IST

लोणावळ्यात १० जणांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : शहरामध्ये एका बंगल्यात रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टमच्या तालावर नर्तिकांसोबत नाचत हुल्लडबाजी करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दहा जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री १२ नंतर गुन्हा दाखल केला. यामध्ये सहा मुलींचा समावेश आहे.  पोलिसांची चाहूल लागताच काही तरुण पळाले. 

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले,  शहरात तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करून रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावून मुलींकडून अश्लील हावभाव करून नाच करायला लावत आहेत, अशी माहिती प्राप्त झाली होती. तत्काळ कारवाई करीत  यामध्ये ९ जणांना ताब्यात घेऊन साऊंड सिस्टम जप्त केले आहे.  लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांनी त्यांच्याकडील बंगले भाड्याने देताना बंगल्यामध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलिस स्टेशनला सादर करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. भाड्याने दिल्या जाणाऱ्या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडून करण्यात आले असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे