शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तरुणाने घेतला गळफास; पोलिसांच्या तत्परतेने वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 13:39 IST

पोलिसांना कॉलवरून तरुणाने फास घेतल्याचे कळताच तातडीने घेतली धाव

धनकवडी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलिस नियंत्रण कक्षातून भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलना एका तरुणाने गळफास घेतल्याबाबत कॉल आला होता. तातडीने पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर आर्थिक विवंचनेतून एका व्यक्तीने काही मिनिटांपूर्वीच गळफास घेतल्याचे दिसले. पोलिस तत्काळ घरातील पंखाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या त्या तरुणाला खाली उतरून १०८ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले. अखेर पोलिसांच्या प्रयत्नामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस नाईक अमर भोसले व पोलीस नाईक दिगंबर भोगन हे गुरूवारी रात्रगस्तीवर होते. त्या वेळी पोलिस नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीद्वारे एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर दोघेही काही मिनिटांतच दत्तनगर जांभूळवाडी मार्गावरील सिद्धीविनायक सोसायटी येथे दाखल झाले. तेथे ३२ वर्षांच्या एका तरुणाने गळफास घेतला होता. पोलीस नाईक अमर भोसले व पोलीस नाईक दिगंबर भोगन यांनी आतून बंद असलेला दरवाजा धक्के मारून उघडला.

त्या दोघांनी तरुणाच्या गळ्यातील फास काढून तरुणाला खाली उतरून घेतले. त्याचवेळी १०८ रुग्णवाहिकेस दूरध्वनी करून बोलावून घेतले. रुग्णवाहिका वेळेत आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. थोड्या वेळाने तो तरुण शुद्धीवर आला. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयही सुखावले. 

टॅग्स :DhankawadiधनकवडीPuneपुणेPoliceपोलिसdocterडॉक्टर