बलात्कार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी

By Admin | Updated: January 20, 2015 00:51 IST2015-01-20T00:51:19+5:302015-01-20T00:51:19+5:30

१२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

The young man raped | बलात्कार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी

बलात्कार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी

पुणे : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने या दंडाच्या रकमेतील ५ हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे ही आदेशात नमूद केले आहे.
विकास भास्कर भालेराव (२० रा. लेबर कॅम्प, सोलासिया सोसायटी, वाघोली मूळ रा. शेनगाव, हिंगोली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी हा वायरमन म्हणून कामास होता. पीडित मुलीचे आई-वडील बिगारी काम करतात. पीडित मुलीला दोन बहिणी असून दोघींचेही लग्न झालेले आहे. एप्रिल २०१२ ते नोव्हेंबर २०१२ दरम्यान पीडित मुलीचे आई-वडील घरी नसताना विकास भालेराव याने पीडित मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुंबई येथे ती मामाच्या घरी असताना तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती २१ महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिने आरोपीने कृत्य केल्याची बाब उघड केली यानंतर विकास विरुद्ध मुंबई येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला १ डिसेंबर २०१२ रोजी अटक करण्यात आली. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील हिरा बारी आणि लीना पाठक यांनी ६ साक्षीदार तपासले. खटल्यात पीडित मुलीची साक्ष, पुरावे महत्त्वाचे ग्राह्य धरले. (प्रतिनिधी)

४आरोपी हा वायरमन म्हणून कामास होता. पिडीत मुलीचे आई-वडील बिगारी काम करतात. पिडीत मुलीला दोन बहिणी असून दोघींचीही लग्न झालेली आहेत. एप्रिल २०१२ ते नोव्हेंबर २०१२ दरम्यान पिडीत मुलीचे आई-वडील घरी नसताना विकास भालेराव याने पिडीत मुलीवर वारंवार बलात्कार केला.

Web Title: The young man raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.