पाईट येथे विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:36+5:302020-11-28T04:07:36+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सुनिल सुरेश डांगले (वय २८) याने पाईट पोलिस दुसक्षेत्रात फिर्याद दिली. पाईट (ता. ...

पाईट येथे विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सुनिल सुरेश डांगले (वय २८) याने पाईट पोलिस दुसक्षेत्रात फिर्याद दिली. पाईट (ता. खेड) येथील करंडे वस्ती येथील गणेश दगडू डांगले (वय ३५) हा पोहण्यासाठी गेला. पोहताना दम लागल्याने तो बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने गणेशच्या वडीलांनी सुनिलला फोन करत याची माहिती दिली. त्यानंतर गणेशच्या वडिलासह ते विहिरीवर गेले. यावेळी बुडून त्याचा मृत्यू झाल्याने त्यांना दिसले. पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार एस.आर. वाघुले करत आहे.