चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:11 IST2021-02-25T04:11:00+5:302021-02-25T04:11:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून ४ जण ...

Young man dies after driver overturns | चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून तरुणाचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून तरुणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार उलटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून ४ जण जखमी झाले. बोपदेव घाटात मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला.

कृष्णकांत नंदकुमार कळसे (वय २५, रा. येवलेवाडी, टिळेकरनगर) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. योगेश परिहार, चैतन्य गणेश गांधी, प्रथमेश टकले अशी जखमी झालेल्या इतरांची नावे आहे. पाच मित्र मोटारीने सासवडवरुन पुण्याकडे मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास येत होते. बोपदेव घाटातील उतारावर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार पलटी होऊन त्यात कृष्णकांत कळसे यांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चैत्राली गपाट व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. जखमींना त्यांनी रुग्णालयात दाखल केले. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Young man dies after driver overturns