फटाका फेकल्याचा जाब विचारल्यामुळे तरूणाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:21 IST2020-12-03T04:21:24+5:302020-12-03T04:21:24+5:30

पुणे : इमारतीच्या टेरेसवर फटाके वाजवत असताना मुलाने फटाका खाली फेकला. सोसायटीच्या खाली खेळणाऱ्या लहान मुलाला फटाक्यामुळे भाजले असते ...

Young man beaten for asking for firecracker | फटाका फेकल्याचा जाब विचारल्यामुळे तरूणाला मारहाण

फटाका फेकल्याचा जाब विचारल्यामुळे तरूणाला मारहाण

पुणे : इमारतीच्या टेरेसवर फटाके वाजवत असताना मुलाने फटाका खाली फेकला. सोसायटीच्या खाली खेळणाऱ्या लहान मुलाला फटाक्यामुळे भाजले असते तर? असा जाब विचारणाऱ्या रहिवाशालाच सोसायटीतील दुसऱ्याने मारहाण करुन जखमी केले. ही घटना २६ नोव्हेंबरला रात्री आठच्या सुमारास नऱ्हेतील प्रज्वल रेसीडेन्सीमध्ये घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सुनील मुंडे (रा. नऱ्हे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. युवराज थिगळे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. युवराज आणि सुनील प्रज्वल सोसायटीत राहायला आहेत. सुनीलचा मुलगा इमारतीच्या टेरेसवर फटाके वाजवित होता. त्यातील एक फटाका त्याने

खाली फेकला. त्यावेळी युवराजचा मुलगा खाली खेळत होता. फटाक्यामुळे मुलाला भाजले असते, असा जाब युवराजने सुनीलला विचारला. त्याचा राग आल्यामुळे सुनीलने युवराजला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.

Web Title: Young man beaten for asking for firecracker