बोपोडी परिसरात टोळक्याकडून तरुणावर सिमेंट ब्लॉकने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST2021-06-30T04:09:08+5:302021-06-30T04:09:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या ८ ते १० साथीदारांनी तरुणावर ...

Young man attacked by cement block in Bopodi area | बोपोडी परिसरात टोळक्याकडून तरुणावर सिमेंट ब्लॉकने वार

बोपोडी परिसरात टोळक्याकडून तरुणावर सिमेंट ब्लॉकने वार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगार व त्याच्या ८ ते १० साथीदारांनी तरुणावर पालघन, लाकडी दांडके, सिमेंटच्या गट्टूने हल्ला केला.

याप्रकरणी अभिषेक मोरे (वय ३०, रा. बोपोडी गावठाण) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रोहित गद्रे (वय ३३, रा. मयूर वाटिका, दापोडी) याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडीतील अखिल गणेशनगर गोल्डन चौक येथे सोमवारी मध्यरात्री घडली. गद्रे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

फिर्यादी व आरोपी हे तोंडओळखीचे आहेत. फिर्यादी हे भाऊ पाटील रोडवरून रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जात होते. या वेळी गद्रे याने त्यांना कट मारला. त्यांनी कट मारून उलट मोरे यांना गाडी नीट चालविता येत नाही का? असे बोलून तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी हे गोल्डन चौकात मित्रासोबत गप्पा मारत बोलत थांबले होते. त्यावेळी गद्रे साथीदारांना घेऊन आला. आरोपींनी पालघनने फिर्यादीवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी तो वार चुकवून तेथून पळून जाऊ लागले. तेव्हा आरोपींनी आम्ही येथील भाई आहोत, तुला सोडणार नाही, असे म्हणत दहशत पसरत फिर्यादीचा पाठलाग करून त्याला पकडले. लाकडी दांडके व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जबर जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक संभाजी तांबे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Young man attacked by cement block in Bopodi area