बालिकेचा विनयभंग तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:16 IST2021-02-21T04:16:29+5:302021-02-21T04:16:29+5:30

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार: धामणी परिसरातील एका घरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात तरुण जेसीबी व ट्रॅक्टर आहे का ...

Young man arrested for molesting a girl | बालिकेचा विनयभंग तरुणाला अटक

बालिकेचा विनयभंग तरुणाला अटक

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार: धामणी परिसरातील एका घरात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात तरुण जेसीबी व ट्रॅक्टर आहे का विचारण्याचा बहाणा करून एका घरात घुसला. त्यावेळी घरात ११ वर्षाची नात व आजोबा होते. आजोबांनी जेसीबी नसल्याचे सांगुणही तो तरुण सोफ्यावर बसला व लहान मुलीला पाणी आणण्यास सांगितले. त्या मुलीच्या पाठोपाठ स्वयपांक घरात जाऊन अज्ञात तरुणाने मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तो निघून गेला. मंचर पोलिसांनी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.सदर मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून धामणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला. अवघ्या तीन दिवसांत सहायक पोलीस निरीक्षक अर्पणा जाधव, पोलीस हवालदार तानाजी हगवणे, संजय नाडेकर, योगेश रोडे, पुंडलिक मराडे, फिरोज मोमीन यांनी सदर तरुणाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. मंचर पोलिसांनी तीन दिवसांत कोणताही मोठा पुरावा उपलब्ध नसताना केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. यामुळे ग्रामस्थांनी मंचर पोलिसांचे कौतुक केले आहे.

Web Title: Young man arrested for molesting a girl