कंटेनरने धडक दिल्याने तरुण मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:10 IST2021-02-25T04:10:44+5:302021-02-25T04:10:44+5:30

या अपघातात सूरज अनिल दणाने (वय १८, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर ता. हवेली) हा तरुण मृत्युमुखी पडला आहे. ...

Young dies after being hit by a container | कंटेनरने धडक दिल्याने तरुण मृत्युमुखी

कंटेनरने धडक दिल्याने तरुण मृत्युमुखी

या अपघातात सूरज अनिल दणाने (वय १८, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर ता. हवेली) हा तरुण मृत्युमुखी पडला आहे. याप्रकरणी विशाल मच्छिंद्र कदम (वय २१, रा. लोणी काळभोर, पाषाणकर बाग, ता. हवेली) या हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक इरशाद मन्सूर अली (वय २७, रा. उडीसा समलपूर, कुमारपाडा, ता. लक्ष्मीपुरी, जि. समलपूर, उडीसा) याला अटक करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर ते पुणे-नगर महामार्गाला थेेेऊर केेसनंदमार्गे जोडणा-या रस्त्याचे काम कासवगतीने सुुरू असल्याने थेऊर फाटा येथे अवजड वाहणांची मोठी गर्दी होत आहेे. त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याचेे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावेे, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

फोटो - मयत सूरज दणाने व अपघातग्रस्त कंटेनर.

Web Title: Young dies after being hit by a container