बैलगाडा शर्यतीच्या जिवावर पुन्हा खासदार व्हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST2020-12-30T04:15:46+5:302020-12-30T04:15:46+5:30

-- नारायणगाव : बैलगाडावाल्यांना तुम्ही पहिला जीव लावा, आम्ही सांगतो तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या जीवावर पुन्हा खासदार व्हाल, आम्हाला ...

You will be an MP again on the life of a bullock cart race | बैलगाडा शर्यतीच्या जिवावर पुन्हा खासदार व्हाल

बैलगाडा शर्यतीच्या जिवावर पुन्हा खासदार व्हाल

--

नारायणगाव : बैलगाडावाल्यांना तुम्ही पहिला जीव लावा, आम्ही सांगतो तुम्ही बैलगाडा शर्यतीच्या जीवावर पुन्हा खासदार व्हाल, आम्हाला रस्ते नको, सन्मान नको मात्र बैलगाडा शर्यत पाहिजे अशी साद बैलगाडा मालकांच्या सुमारे चाळीस जणांच्या शिष्टमंडळाने खा . डॉ . अमोल कोल्हे यांना घातली .

जुन्नर, आंबेगाव, खेड आणि हवेली तालुक्यातील बैलगाडा मालकांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथील कार्यालयात भेट घेऊन बैलगाडा शर्यत तात्काळ सुरू करावी करावी अशी साद घालत आमची मागणी पूर्ण झाल्यावर तुम्हीच पुन्हा खासदार होणार असे आश्वासन या शिष्टमंडळाने दिले .

यावेळी खासदार डॉ कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी आपण संसदेत वेळोवेळी मुद्दे उपस्थित करत आहोत असे स्पष्ट केले .

यावेळी बैलगाडा मालक बाळासाहेब आरुडे, बाळासाहेब चव्हाण, राकेश खैरे, प्रकाश कबाडी, रमेश डोंगरे, समीर वाजगे, राजुशेठ चव्हाण, विजू गायकवाड, के के थोरात, सुरेश मातेले, विकास नायकवडी, अप्पा जाधवर, जानकू डावखर, सोमनाथ डुंबरे, मयूर वाबळे, अजित नेहरकर, गिरीश आवटी, शांताराम अभंग आदी बैलगाडा मालक व गाडाशौकीन उपस्थित होते.

--

Web Title: You will be an MP again on the life of a bullock cart race