शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याकडे शाळेचा दाखला नाही...तुम्हाला देशाच्या बाहेर काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:01 IST

आमच्याकडे शाळेचे दाखल नाही... आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरुआंदोलनामध्ये सहभागी नागरिकांना ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट

पुणे :  सरकार आम्हा नागरिकांना देशाच्या बाहेर काढणार आहे... आम्ही आदिवासी नागरिक.. आमच्यात कोणी शिकलेले नाही... आमच्याकडे शाळेचे दाखल नाही... आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड आहे...पण जातीचा दाखला काढायचा तर दोन-चार हजार खर्च कोण करणार... यामुळेच आम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालो असून, शासनाचा विरोध करण्यासाठी पुण्यात आलो असल्याची माहिती सोमवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदीवासी भटका बहुजन संघटनेच्या वतीने केंद्र शासनाने देशात लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या आदिवासी महिलांनी सांगितले.     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटना, विविध जाती-धर्मांच्या लोकांकडून केंद्र शासनाने देशात लागू केलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. परंतु आंदोलन करणाऱ्या व आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या अनेक नागरिकांना ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ची पुरेशी माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नागरिकांची दिशाभूल करुन आंदोलनामध्ये सहभागी करुन  घेतले जात असल्याचेही उघड झाले आहे. सोमवार (दि.२०) रोजी एनआरसी आणि सीएए या कायद्याच्या निषेधार्थ व जिल्ह्यातील मावळ, खेड, मुळशी, हवेली तालुक्यातील भूमीपूत्र आदिवासी व भटक्या बांधवाच्या मुलभूत न्याय हक्कासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या काही आदिवासी महिलांना आंदोलनामध्ये कशासाठी सहभागी झालात याबाबत विचारले असता ही माहिती समोर आली.    आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मावळ तालुक्यातील मानू मंगल मूकणे यांनी सांगितले की, आमच्या गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांना तुमच्याकडे शाळेचा दाखला, जातीचे दाखले नाही. त्यामुळे तुम्हाला शासनाकडून देशाबाहेर काढणार असल्याचे सांगितले. तर प्रिया यांनी सांगितले की, गरिबाकडे जाग- जमिन नाही, कागदपत्र नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, सरकारचे काय चालले आहे, काही कळत नाही. आमच्याकडे आधार कार्ड आहे, रेशनकार्ड आणि आणि मतदान कार्डपण आहे.. मग आम्हाला का देशा बाहेर काढणार, आम्हा आदिवासांना काहीच अधिकार नाही का, असा सवाल प्रिया यांनी उपस्थित केला...........आदिवासी दाखला नसणे आणि नागरिकत्व काही संबंध नाहीआदिवासी दाखला अथवा शाळेचा दाखला नसणे यामुळे तुम्ही या देशाचे नागरिक आहात किंवा नाही याचा काही संबंध नाही. आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड असणे हे देखील नागरिकत्वासाठी पुरेसे पुरावे आहेत. आदिवासी दाखला नसल्याने फार तर शासनाच्या आदिवासीसाठी असलेल्या योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. परंतु हा दाखला नसला म्हणजे तुम्ही या देशाचे नागरिक नाही असे काही होत नाही. नागरिकांनी याबाबत गैरसमज करुन घेऊन नये. तसेच देशात एनआरसी आणि सीएए कायदा लागू झाल्यानंतर अद्याप एकही अर्ज आपले नागरिकत्व सिध्द करण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे आलेला नाही.- डॉ.जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी 

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकGovernmentसरकार