आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:19 PM2019-03-28T14:19:06+5:302019-03-28T14:24:04+5:30

निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

you can vote beside u don't have voter id card | आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

आता मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान

Next

पुणे : तुमच्याकडे  मतदान ओळखपत्र नसेल तरी तुम्हाला मतदान करता येणार आहे. निवडणूक आयाेगाने विविध 11 ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. 

मतदान ओळखपत्र हरवले तर काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडताे. तसेच मतदान करता येईल का याबाबतही संभ्रमावस्था असते. अशा मतदारांसाठी निवडणुक आयाेगाने संकेस्थळावर मतदार ओळखपत्र नसल्यास काेणती 11 ओळखपत्रे मतदान केंद्रावर घेऊन जाता येतील याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांनाही मतदान करता येणार आहे. परंतु यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. 
 
निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती   
१. पासपोर्ट  
२. वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )  
३. छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र )   
४. छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक  
५. पॅनकार्ड   
६. एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड  
७. मनरेगा कार्यपत्रिका  
८. कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  
९. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज   
१०. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र   
११. आधारकार्ड 

Web Title: you can vote beside u don't have voter id card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.