शहरं
Join us  
Trending Stories
1
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
2
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
3
अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
4
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
5
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
6
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
7
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
8
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
9
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
10
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
11
Viral Video: संतापजनक! रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेला तरुण, तृतीयपंथींचा घोळका त्याच्याजवळ गेला अन्...
12
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
13
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
14
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
15
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
16
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
17
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
18
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
19
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
20
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
Daily Top 2Weekly Top 5

योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान;रशियात पार पडलेल्या पावरलिफ्टिंग स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:14 IST

दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला होता

महादेव मासाळ

पिंपळे गुरव  - पिंपळे गुरवचे सुपुत्र योगेश दत्तात्रय जांभुळकर यांनी पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात दमदार कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. मॉस्को, रशिया येथे ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या वर्ल्ड पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत योगेश जांभुळकर यांनी ७५ किलो वजनी गट, मास्टर कॅटेगरीत चार सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक जिंकत भारतासाठी ऐतिहासिक यश संपादन केले. त्यांच्या या भव्य यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून मायदेशी परतल्यानंतर पिंपळे गुरव ग्रामस्थ तसेच मित्रपरिवाराने त्यांचा सत्कार करून अभिमान व्यक्त केला.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला होता. या कामगिरीच्या जोरावरच त्यांची रशियातील आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड झाली. त्या ठिकाणच्या जागतिक स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकांची कमाई करत प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेत दमदार कामगिरी करत यशस्वी होऊन भारतात परतल्यानंतर पिंपळे गुरव ग्रामस्थ व मित्रपरिवार तसेच कुटुंबातील सदस्यांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. परिवारातील महिला सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे औक्षण करत उत्स्फूर्त स्वागत केले. तसेच येथील ‘राजमाता जिजाऊ उद्यान ग्रुप’ यांच्या वतीने योगेश जांभुळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हे यश मिळवण्यासाठी योगेश यांनी कठोर मेहनत, नियमित सराव आणि नियंत्रित आहाराचे काटेकोर पालन केले. त्यांचे हे घवघवीत यश म्हणजे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची पावती असून त्यांनी पिंपरी–चिंचवड, पुणे तसेच महाराष्ट्र आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yogesh Jambhulkar Wins Gold in Russia, Makes India Proud

Web Summary : Yogesh Jambhulkar secured gold at the World Powerlifting Championship in Russia. Representing India, he won four gold and one bronze medal in the 75 kg Master category. His achievement was celebrated with a procession and honors upon his return to Pimple Gurav.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे