बारामतीच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप निश्चित

By Admin | Updated: February 2, 2016 01:13 IST2016-02-02T01:13:58+5:302016-02-02T01:13:58+5:30

बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप यांची आज सोमवार, दि. १ रोजी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

Yogesh Jagtap is the President of Baramati city | बारामतीच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप निश्चित

बारामतीच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप निश्चित

बारामती : बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी योगेश जगताप यांची आज सोमवार, दि. १ रोजी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. जगताप हे बारामतीचे सर्वांत तरुण नगराध्यक्ष ठरणार आहेत. अधिकृत घोषणा गुरुवारी (दि. ४) होणार आहे.
सुभाष सोमाणी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. विद्यमान नगरसेवकांपैकी आठ जण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते. आपली वर्णी लागावी यासाठी त्यांनी अजित पवारांकडे पाठपुरावा केला होता. बारामतीचा नगराध्यक्ष कोण होणार, याकडे परिसरातील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. जगताप हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
योगेश जगताप यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष, तसेच नंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष होते. या वेळी ते दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागील कार्यकालात ते बारामती नगरपरिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती होते. योगेश जगताप हे राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी रक्तदान शिबिरांसह विविध उपक्रम राबवीत असतात.
अजित पवार यांच्या सूचनेनुसार रविवारी (दि. ३१) आठ इच्छुकांनी आपले अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुपूर्त केले. त्यात योगेश जगताप, विक्रांत तांबे, श्याम इंगळे, नितीन बागल, जयसिंग देशमुख, प्रशांत भोईटे, संजय लालबिगे व राजेंद्र बनकर यांचा समावेश होता.

Web Title: Yogesh Jagtap is the President of Baramati city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.