हो, आम्ही मृतदेहांना नटवण्याचे काम करतो
By Admin | Updated: November 8, 2014 23:55 IST2014-11-08T23:55:30+5:302014-11-08T23:55:30+5:30
अत्यंत वेदनादायी गोष्ट असून, हे दु:ख कमी करण्यासाठी या मृतदेहांना शक्य तेवढे नटवून नातेवाइकांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न गेली 2क् वर्षे माङो वडील आणि मी करीत आहोत

हो, आम्ही मृतदेहांना नटवण्याचे काम करतो
पुणो : अपघातांमध्ये आणि इतर दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्या आपल्या प्रियजनांचे छिन्नविछिन्न झालेले अवयव पाहणं, हे अत्यंत वेदनादायी गोष्ट असून, हे दु:ख कमी करण्यासाठी या मृतदेहांना शक्य तेवढे नटवून नातेवाइकांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न गेली 2क् वर्षे माङो वडील आणि मी करीत आहोत आणि अशा शवागारात काम करणा:या माङयासारख्या व्यक्तीचा आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त होणारा गौरव हा माङया आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे, असे प्रतिपादन भोर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करणा:या शीतल रामलाल चव्हाण हिने व्यक्त करताच उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला.
अकरा मारुती चौक मंडळाच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात शीतल चव्हाण यांच्यासोबतच बिबवेवाडी येथील स्मशानभूमीत गेली 3क् वर्षे वास्तव्य करून अंत्यसंस्काराचे काम निरपेक्षपणो करणारे कुंडलिक लिंबाजी लोणारे, यांचा व नागरी संरक्षण दलातील जवानांचा कृतज्ञता गौरव करण्यात आला. याप्रसंगी शीतल चव्हाण बोलत होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कायदेतज्ज्ञ अॅड. प्रताप परदेशी, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, ज्येष्ठ पत्रकार गोपाळ जोशी, आनंद सराफ, यशस्वी बांधकाम व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष नंदू घाटे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
विनायक घाटे यांनी दीपोत्सवाच्या निमित्ताने समाजाच्या दुर्लक्षित क्षेत्रत निरपेक्ष भावनेने काम करणा:या कर्मयोग्यांना प्रकाशात आणण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)