येरवडा, विश्रांतवाडीचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

By Admin | Updated: May 7, 2014 01:20 IST2014-05-06T21:18:49+5:302014-05-07T01:20:24+5:30

बंडगार्डन पुरवठा केंद्राअंतर्गत पंपींग स्टेशनमधील मुख्य जलवाहिनी व विद्युतविषयक दुरुस्तीच्या कामामुळे बंडगार्डन व येरवडा भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

Yerwada, Vishrantwadi water supply closed on Thursday | येरवडा, विश्रांतवाडीचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

येरवडा, विश्रांतवाडीचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पुणे : बंडगार्डन पुरवठा केंद्राअंतर्गत पंपींग स्टेशनमधील मुख्य जलवाहिनी व विद्युतविषयक दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. ८) तातडीने करण्यात येणार आहेत. त्यादिवशी शहराच्या उत्तर भागातील पाणी पुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. त्यामध्ये कळस, धानोरी, लोहगाव, कलवर्ट वस्ती, खेसे पार्क, एअर फोर्स, विद्यानगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, विमानगर, मुळा रोड, खराडी, ठुबे-पाठरे नगर, श्रीराम सोसायटी, सैनिकवाडी, सोपाननगर, खराडी, वडगावशेरी, येरवडा, लक्ष्मीनगर, यशवंत नगर, जय जवाननगर, सुरक्षानगर, माणिकनगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, गांधीनगर, नागपूरचाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कल्याणीनगर, आदर्शनगर, हरीनगर,रामवाडी, आळंदी रस्ता, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, संगमवाडी, फुलेनगर, शांतीनगर, विश्रांतवाडी, प्रतिकनगर आदी भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहेत. तसेच, दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Web Title: Yerwada, Vishrantwadi water supply closed on Thursday