येरवडा कारागृहातच कैद्याची आत्महत्या

By Admin | Updated: November 18, 2016 13:49 IST2016-11-18T13:49:44+5:302016-11-18T13:49:44+5:30

अनैसर्गिक बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने येरवडा कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Yerawada prisoner commits suicide | येरवडा कारागृहातच कैद्याची आत्महत्या

येरवडा कारागृहातच कैद्याची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 18 - अनैसर्गिक बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने येरवडा कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. हाडकसिंग उर्फ खाडकसिंग जलसिंग पांचाळ असे आरोपीचे नाव असून त्याला नुकतीच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 
 
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता. 2013 साली त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कारागृहात रवानगी केली. तपासादरम्यान त्याच्याविरोधातील आणखी भयानक गुन्हे समोर आले. 
 
खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने 22 सप्टेंबर 2016 रोजी त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.  यानंतर शुक्रवारी पहाटे त्याने 18 क्रमांकाच्या खोलीतील लाकडी खुंटीला कापडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 
 

Web Title: Yerawada prisoner commits suicide