शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Pune: भरधाव डंपरचे चाक फुटल्याने अपघात; दोन शाळकरी मुले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 12:04 IST

या अपघातात दोन मुले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

येरवडा: डंपरचे चाक फुटून खराडी (kharadi) येथे झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात देवांश चव्हाण (वय 15, रा. मोजेसवाडी वडगावशेरी) व प्रथमेश देसाई (वय 15, रा. विश्रांतवाडी पुणे) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चालकाविरुद्ध बेदरकारपणे डंपर चालवून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांश व प्रथमेश हे दोघेही खराडी येथील निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल या शाळेत नवव्या इयत्तेत शिकतात. शाळा सुटल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास चालत बसस्टॉपकडे जात असताना रेडिसन हॉटेलच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारा डंपर क्रमांक (एम एच- 12,  क्यूजी -38 67) याचे  मागील बाजूस असलेले चाक अचानक फुटले. शेजारी रस्त्यावरून चाललेल्या देवांश व प्रथमेश यांना फुटलेल्या चाकातील अचानक वेगाने आलेल्या हवेमुळे दोघेही खाली कोसळले. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी अपघात करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक शिसाळ करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातYerwadaयेरवडा