शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट जय मल्हार..! चंपाषष्ठी उत्सवनिमित्त जेजुरी गडावर भंडारा खोबऱ्याची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 19:02 IST

खंडोबाच्या वर्षकाठी भरणाऱ्या आठ यात्रा उत्सवांपैकी चंपाषष्ठी उत्सवाला मोठे महत्त्व आहे.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्ठीचे औचित्य ‘सदानंदाचा येळकोट’ ‘येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडारा खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांनी रांगा लावून कुलदैवताचे दर्शन घेतले. गडावर आणि शहरात सर्वत्र कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम, तसेच देवाचा जयघोष ऐकू येत होता. भंडार खोबऱ्याच्या मुक्त हस्ताने करण्यात आलेल्या उधळणीमुळे संपूर्ण गडकोट आणि प्रमुख रस्ते पिवळ्या जर्द भंडाऱ्याने माखल्यामुळे सोन्याच्या जेजुरीचा भास होत होता.खंडोबाच्या वर्षकाठी भरणाऱ्या आठ यात्रा उत्सवांपैकी चंपाषष्ठी उत्सवाला मोठे महत्त्व आहे, मणी मल्ल दानवांच्या संहारासाठी शंभू महादेवाचे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत घनघोर युद्ध झाले. युद्धात मणीचा अंत झाला आणि मल्ल शरण आला. विजयानंतर ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी, भंडार खोबरे उधळून देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला अशी आख्यायिका असून, तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे. तोच हा चंपाषष्ठी उत्सव.आज सकाळी देवाची महापूजा, महाभिषेकानंतर बालदारीतील घट उठवण्यात आले. त्यानंतर घराघरांतीलही घट उठले. देवाला वांगे भरीताचा नैवेद्य दाखवून उत्सवाचा उपवास सोडण्यात आला. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या कालावधीत जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सव साजरा होतो. चंपाषष्ठीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारो भाविक जेजुरी गडावर येऊन भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण करीत कुलदैवतचा जयजयकार करीत होते. दर्शन रांगेतून कुलदैवताचे दर्शन घेत होते.

 भरीत रोडग्याचा नैवेद्य

आषाढ नवमीला कांदे नवमी असे ही म्हटले जाते. नवमीपासून खंडोबा भक्त कांदे, लसूण, वांगे खाण्यास वर्ज्य करीत असतात. यालाच चातुर्मास असेही संबोधले जाते. शनिवारी मात्र कुलदैवतला भरीत वांगे कांद्याचा नैवेद्य अर्पण करून हे पदार्थ खाण्यास सुरुवात करतात. सकाळपासूनच जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. सोबत भरीत रोडग्याचा नैवेद्य कुलदैवताला मोठ्या भक्तिभावाने अर्पण करीत होते, तर येथील जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानने भाविकांसाठी भरीत रोडग्याचा समावेश असलेल्या मिष्टान्न महाप्रसादाची सोय केली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रJejuriजेजुरी