शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा ‘गदिमा पुरस्कार’ उषा मंगेशकर यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 18:54 IST

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गदिमा स्मृती समारोहामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा

ठळक मुद्देनीना दिलीप कुळकर्णी यांना  ‘गृहिणी-सखी-सचिवमहेश काळेंना  ‘चैत्रबन’ तर प्रियांका बर्वे  ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कार

पुणे : स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक घराण्याचा अजोड वारसा लाभलेल्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना यंदाचा  ‘गदिमा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच  मराठी-हिंदी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीसह चित्रपटांमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या नीना दिलीप कुळकर्णी यांना ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार दिला जाणार असून, नव्या उभारीच्या आणि प्रतिभेच्या कलाकाराला दिला जाणारा ‘चैत्रबन’ पुरस्कार युवा गायक महेश काळे यांना तर गदिमांची कन्या स्व. प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा  ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ गायिका प्रियांका बर्वे हिला प्रदान केला जाणार आहे. गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गदिमा स्मृती समारोहामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध उद्योजक डॉ. अरूण फिरोदिया भूषविणार आहेत. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सिद्धार्थ बेंद्रे सांभाळणार आहेत.ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याबरोबर 1953 साली आपल्या गीत गायनाचा प्रारंभ करणा-या उषा मंगेशकर यांनी नौशाद यांच्यापासून ते जतीन-ललित संगीतकारांसाठी गाणी गायली आहेत.‘मुंगळा मुंगळा’ हे गीत असो किंवा ’माळ्याच्या मळ्यामंधी,  ‘एका हौस पुरवा महाराज’ सारख्या लावण्या अशी त्यांची अनेक गीते अफाट लोकप्रिय झाली आहेत. त्यांना  ‘गदिमा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. 21 हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.दिलीप कुळकर्णी या मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील उमद्या व हरहुन्नरी कलाकाराची पत्नी असलेल्या नीना कुळकर्णी या देखील प्रतिभावंत अभिनेत्री. ‘हमीदाबाईंची कोठी’, ‘महासागर’,‘आधे अधुरे’,‘मायावी सरोवर’ अशी मराठी-हिंदीतील नाटके किंवा’दिले नादान’, ’बादल’, ‘पहेली’ असे त्यांचे हिंदी चित्रपट असोत त्यांच्या अभिजात प्रतिभेला रसिकांनी पसंती दिली आहे. त्या यंदा  ‘गृहिणी-सखी-सचिव’ च्या मानकरी ठरल्या आहेत. 11 हजार रूपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतीय संगीताचा झेंडा सप्तखंडात फडकवणारा नव्या पिढीचा गायक महेश काळे यांना  5 हजार रूपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन ‘चैत्रबन’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . पार्श्वगायन आणि अभिनय क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेल्या प्रियांका बर्वे हिला  ‘विद्या प्रज्ञा’ पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय उस्मानाबाद येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचा विद्यार्थी कु. तेजस लालासाहेब पवार याला ’गदिमा पारितोषिक’ दिले जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेUsha Mangeshkarउषा मंगेशकरMahesh Kaleमहेश काळेmusicसंगीतartकला