यंदाही जिंकली!
By Admin | Updated: December 15, 2014 01:44 IST2014-12-15T01:44:15+5:302014-12-15T01:44:15+5:30
‘ती’ आली... धावली... आणि दुसऱ्या वर्षीही तिने प्रथम क्रमांक पटकावला. ‘ती’च ठरली बारामतीच्या शरद मॅरेथॉन स्पर्धेची सेलिब्रिटी...!’

यंदाही जिंकली!
बारामती : ‘ती’ आली... धावली... आणि दुसऱ्या वर्षीही तिने प्रथम क्रमांक पटकावला. ‘ती’च ठरली बारामतीच्या शरद मॅरेथॉन स्पर्धेची सेलिब्रिटी...!’ लता भगवान करे... या वयाची साठी ओलांडलेल्या महिलेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. अनवाणी पायाने ती धावली... आणि पुन्हा जिंकली... तिला गरज आहे पैशांची, तीही पतीच्या औषधोपचारासाठी...!
बुलढाणा जिल्ह्यातील मोहना (ता. मेहकर) येथील मूळ रहिवासी असलेले करे कुटुंबीय रोजंदारीच्या शोधात बारामतीत जळोची येथे स्थायिक झाले आहे. लता करे गेल्या वर्षीही या स्पर्धेत अशाच अनवाणी धावल्या होत्या. पतीच्या दुर्धर आजारावर उपचार करण्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी स्पर्धा जिंकल्यानंतर अनेकांनी आर्थिक मदत केली. पतीला मेंदूचा आजार असल्यामुळे ते गेल्या वर्षभरापासून काम करीत नाहीत. कुटुंबाची जबाबदारी लताताई करे यांच्यावर आहे. या वेळी अभिनेत्री श्वेता शिंदे हिने लतातार्इंना सलामच ठोकला. (वार्ताहर)