शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या पिफमध्ये ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागच रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 01:06 IST

नम्रता फडणीस पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी ‘मराठी सिनेमा टुडे’ विभाग असतो.यंदाच्या महोत्सवात रसिक या चित्रपटांना मुकणार ...

नम्रता फडणीसपुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी ‘मराठी सिनेमा टुडे’ विभाग असतो.यंदाच्या महोत्सवात रसिक या चित्रपटांना मुकणार आहेत. या विभागामध्ये अप्रदर्शित चित्रपट दाखविण्यासाठी निर्मात्यांकडे सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राच्या अभावी चित्रपट घेत नाहीत. या विभागासाठी अटीएकही चित्रपट उपलब्ध न झाल्यामुळे ‘मराठी सिनेमा टुडे’ हा विभागच रदद करावा लागला असल्याचे आयोजकांकडून सांगितले आहे. तर दुसरीकडे महोत्सवात स्पर्धेव्यतिरिक्त चित्रपट प्रदर्शित करण्यास निर्मातेच अनुत्सुक असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे.

मराठी चित्रपट स्पर्धेव्यतिरिक्त ज्या निर्मात्यांना महोत्सवात ‘प्रिमिअर’ करायची इच्छा आहे. त्यांना ‘मराठी सिनेमा टुडे’ या विभागातंर्गत अप्रदर्शित चित्रपट दाखविण्याचे व्यासपीठ खुले केले आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाबरोबरच माध्यमांशी संवाद साधण्याची संधीही निर्माता, दिग्दर्शकांना दिली जाते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच माध्यमांकडून प्रसिद्धी मिळाल्याने चित्रपटाची चर्चा होते. आजवर महोत्सवात प्रथमच सादरीकरण झालेल्या ’ख्वाडा’,‘अस्तु’, ‘हलाल’, ‘कोर्ट’ सारखे अनेक मराठी चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले असून, महोत्सवामुळे या चित्रपटांचा सर्वत्र बोलबाला झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. त्यामुळे महोत्सवामध्ये मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी निर्मात्यांकडून आवर्जून प्राधान्य दिले जाते. यंदाच्या वर्षी मात्र मराठी स्पर्धात्मक विभागात निवड केलेले सात चित्रपट सोडले तर एकाही चित्रपटाचा ‘प्रिमिअर’ पिफमध्ये पाहायला मिळणार नाही. यंदा चित्रपटच उपलब्ध न झाल्यामुळे ‘मराठी सिनेमा टुडे’ हा विभाग रदद केला असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.नियम व अटी पाळायला हव्यातपटेल म्हणाले, पिफमध्ये मराठी चित्रपट स्पर्धेकरिता 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत सेन्सॉर झालेले प्रदर्शित आणि अप्रदर्शित चित्रपट पाठविण्याचा नियम आहे. उदा:स्पर्धेसाठी 52 मराठी चित्रपट आले तर त्यातील सात चित्रपटांची निवड केली जाते. त्यानंतर निर्मात्यांना स्पर्धेव्यतिरिक्त चित्रपट दाखवायचे आहेत का? अशी विचारणा होते. चित्रपट दाखवायचा किंवा नाही हे त्यांच्या मर्जीवर असते. त्यांनी सहमती दर्शविल्यानंतर ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागांतर्गत त्यांचे चित्रपट दाखविले जातात.४या विभागात चित्रपट दाखवायचा असेल तर तो चित्रपट अप्रदर्शितच असावा आणि तो सेन्सॉर झालेला असावा असा नियम आहे. परंतु निर्माते नियम वगैरे वाचत नाहीत आणि वेगळाच आग्रह धरतात. ब-याचशा निर्मात्यांकडे सेन्सॉर मंडळाचे प्रमाणपत्रच नसते. असे चित्रपट ‘मराठी सिनेमा टुडे’ विभागामध्ये घेता येत नाहीत, असे पटेल म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणे