यवतला बस-कंटेनरचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:51+5:302021-01-13T04:25:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवत : येथे पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल मिनी बस दुभाजक ओलांडून कंटेनरला धडकून झालेल्या भीषण अपघातात ...

यवतला बस-कंटेनरचा अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवत : येथे पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल मिनी बस दुभाजक ओलांडून कंटेनरला धडकून झालेल्या भीषण अपघातात बसचालक जागीच ठार झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अपघातात कंटेनरदेखील दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन महामार्गावर जाऊन दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती.
ही घटना रविवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली.
गजानन अगरवाल असे या अपघातात अपघातात मृत्यू झालेल्या मिनी बसचालकाचे नाव आहे. अपघातानंतर मिनी बस सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पलटी झाली होती. तर कंटेनर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाऊन पुलाला धडकला. कंटेनरमधील लोखंडी पट्ट्या महामार्गावर दोन्ही मार्गिकेवर विखुरल्या गेल्या होत्या. कंटेनर आणि बसच्या अपघातानंतर पाच मिनिटांच्या आताच पुण्याकडे जाणारी कार कंटेनरला धडकता धडकता वाचली. मात्र यात कारचे नुकसान झाले. कारमधील प्रवासी बालंबाल बचावले. मिनी बसमध्ये चालक व एकच प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दौंडकर, खत्री, सुपेकर, कापरे आदी कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली. टोल कंपनीच्या क्रेनच्या साहयाने अपघात स्त वाहने बाजूला करण्यात आली.
फोटो ओळ :- यवत येथे महामार्गावर अपघातग्रस्त कंटेनर व बस