यवतला दोन दुकाने फोडली
By Admin | Updated: October 8, 2015 05:33 IST2015-10-08T05:33:30+5:302015-10-08T05:33:30+5:30
यवतमध्ये कारचोरीच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी दोन दुकानांचे शटर उचकटून सुमारे ६० हजार रुपयांचा माल व रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. ही घटना काल

यवतला दोन दुकाने फोडली
यवत : यवतमध्ये कारचोरीच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी दोन दुकानांचे शटर उचकटून सुमारे ६० हजार रुपयांचा माल व रोख रक्कम चोरांनी लंपास केली आहे. ही घटना काल (दि.६) रात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या मेहता कॉम्पलेक्समध्ये घडली.
मागील दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास यवत स्टेशन रोड व गावठाण परिसरात चारचाकी वाहनचोरीची घटना ताजी असताना, आता दुकानांमध्ये चोरी घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
काल रात्रीच्या सुमारास मेहता कॉम्पलेक्समधील युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक्स व बालाजी ट्रेंडिंग कंपनी या दोन दुकानांची शटर उचकटली व दुकानांमध्ये प्रवेश करून, रोख रक्कम व काही माल लंपास केला. याबाबत बापू दत्तात्रय जगदाळे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार युनिव्हर्सल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर चोरांनी उचकटून आतील मोठी काच फोडून दुकानात प्रवेश केला. या वेळी दुकानातील रोख रक्कम ३१ हजार रुपये, एक मोबाईल व इतर इलेक्ट्रिक वस्तू असा एकूण ५५,४०० रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे. बालाजी ट्रेंडिंग कंपनीमधील चोरीबाबत मात्र पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती. (वार्ताहर)