वरवंड ग्रामदैवताची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:41+5:302020-11-28T04:06:41+5:30
ग्रामस्थांनी साधेपणाने व गर्दी न करता आणि आरोग्य विषयक सर्व बाबींचे पालन करावे पै पाहुणे व मित्रमंडळी यांना यात्रेचं ...

वरवंड ग्रामदैवताची यात्रा रद्द
ग्रामस्थांनी साधेपणाने व गर्दी न करता आणि आरोग्य विषयक सर्व बाबींचे पालन करावे पै पाहुणे व मित्रमंडळी यांना यात्रेचं निमंत्रण देणं टाळावं, श्रींची पालखी, छबिना व लोटांगण सोहळा अगदी कमी ग्रामस्थांच्या उपस्थित होणार आहे. यात्रा रद्द झाली आहे मात्र देवदर्शनासाठी जाताना मास्क बंधनकारक सॅनिटायझर इत्याचीचा वापर करणे ज्या भाविकांनी मास्क घातले नसल्यास त्यांना देवदर्शन घेता येणार नाही, सुरक्षित अंतर राखून देवदर्शन करावे.
लहान मुलं आणि वयोवृद्धांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे या वर्षी पहाटेपासून होणारे भाविकांचे दंडवत आरोग्य सुरक्षतिततेच्या कारणास्तव होणार नाहीत. यात्रा कमिटी,ग्रामपंचायत वरवंड यांनी आव्हान केले असल्याची माहिती किशोर दिवेकर पोलीस पाटील यांनी दिली आहे.
वरवंड गावची यात्रा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने रद्द केली असून पालखी मिरवणूकच्या वेळेस अवघ्या पाच लोकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळा काढावा कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा आयोजकांवर व नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिला.