शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत सहकारी कारखाना आता भाडेतत्वावर; सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:26 IST

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देकराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा कारखाना प्रशासनास देण्यात आल्या सूचनायशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा

लोणी काळभोर : तत्कलीन संचालक मंडळाने केलेल्या कथित गैरव्यवहारामुळे गेल्या सहा वर्षांपासून गाळपाविना बंद पडलेला थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्वावर चालविण्याच्या निर्णय राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. कराराची (मुदत) निविदा तत्काळ काढण्याचा सूचना कारखाना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. गेली काही दिवस हा कारखाना जागा विकून सुल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत नसल्याने हा निर्णय घेतण्यात आल्याचे समजते. कारखाना भाडेतत्वावर सुरू करण्यासाठी कारखान्यावरील १७२ कोटी कर्जाचा अर्थिक आराखडाही तयार करण्याचा सूचना सहकारमंत्र्यांनी कारखाना प्रशासनास दिल्या आहेत. विविध अडचणींमुळे आजारी व बंद पडलेले कारखाने पूर्ववत सुरू व्हावेत म्हणून सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असलेल्या समितीची मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे, राज्याचे साखर आयुक्त संभाजी कडू पाटील, साखर संचालक किशोर तोष्णीवाल, प्रादेशिक सहसंचालक शशिकांत घोरपडे, यशवंतचे आवसायक अधिकारी बी. जे. देशमुख यांचसमवेत अधिकारी वर्ग उपस्थित होते.बैठकीमध्ये सहकारमंत्र्यांनी यशवंतची सध्याच्या अर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यांवेळी आमदार पाचर्णे यांनी कारखान्यावरील बँक व विविध वित्तीय संस्थाच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला. यांमध्ये त्यांनी कारखान्यावरील २७ कोटी रूपयांचा कर्जासाठी तब्बल ३०० कोटी रुपये किमतीची मिळकत राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेची बाब उपस्थितांच्या निदर्शनात आणून दिली. व यशवंतच्या स्थावर व जंगम मालमत्तेची विक्री न करता शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कारखाना सुरू करण्याची विनंती सहकारमंत्र्यांना केली. यांनंतर बंद पडल्यानंतर गेली सहा वर्षे प्रशासनाने कारखान्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले यांबाबत चर्चा झाली.बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाध्यक्ष राजु शेट्टी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे सहभागी झाले होते. यामध्ये यशवंत भविष्यात सुरु व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यायांवर चर्चा करण्यात आली. विशेष सर्वसाधारण सभेत शेतकरी सभासदांनी  भाडेतत्त्वावर कारखाना सुरू करण्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार यशवंत चालू  करण्याचा निर्णय झाला आहे. १७२ कोटी कर्जानुसार कारखान्याचा अर्थिक आराखडा भाडेतत्वावर चालू करण्यास तयार करून सर्व भाडेतत्वाची मुदत निश्चित करून निविदा काढण्याचा सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत.

सदर बैठकीत यशवंत भाडेतत्त्वावर चालू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. एकूण देणी व कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास दिल्यानंतर त्याची वसूली किती वर्षांनी होईल याबाबत यशवंतचा आर्थिक आराखडा तयार करून त्यानंतर साखर आयुक्तांची परवानगी घेऊन भाडेतत्वाची निविदा प्रक्रिया राबविणार आहे.-बी. जे. देशमुख, आवसायक, यशवंत कारखाना  

 

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र