शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना : रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 9:37 PM

रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते.

ठळक मुद्दे२५० रुपयांचा दंड आकारलारेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक

पुणे : फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसत आहे. फलाट तिकीटाची वेळ संपल्याचे कारण देत त्यांच्याकडून २५० रुपयांचा दंड आकारला जात आहे. गाडीला विलंब होणे ही प्रवाशांची चुक नाही. तरीही दोन तासाची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम आहे. या नियमाचा भुर्दंड सध्या अनेकांना सोसावा लागत आहे.रेल्वे स्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. या तिकीटाची मुदत दोन तासांची असते. ही मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घ्यावे, असा नियम आहे. दररोज हजारो फलाट तिकीटांची विक्री होते. त्यातून रेल्वेला मोठा महसुल मिळतो. पण, फलाट तिकीट काढणाºया अनेकांना वेगळ््याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी एका तरूणालाही याचा फटका बसला. तो फलाट तिकीट काढून महाराष्ट्र एक्सप्रेसची वाट पाहत थांबला होता. पण गाडी विलंबाने आली. त्यातच तिकीटाची वेळ निघून गेल्याने तिकीट तपासणीसाने त्याला पकडले. त्याच्याकडून त्यावेळी फलाटावर उभ्या असलेल्या लोणावळा लोकलचे कमीत कमी भाडे २० रुपये व दंडाची २५० असा एकुण २७० रुपये दंड घेतला. याबाबत त्याने टिष्ट्वटरद्वारे रेल्वे मंत्रालय पुणे विभागाकडे ह्यगाडी विलंबाने आली, याचा माझा दोष कसाह्ण नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी तिकीटाची मुदत संपल्याने नियमानुसार नवीन तिकीट घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गाडी विलंबाने आल्याचा फटका प्रवाशांना सोसावा लागत असला तरी रेल्वेकडून नियमावर बोट ठेवले जात आहे.----------रेल्वेच्या नियमानुसार तिकीटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. तसेच न केल्यास त्यावेळी संबंधित फलाटावर उभ्या असलेल्या गाडीचे कमीत कमी तिकीट व २५० रुपये दंड अशा एकुण रकमेची दंडात्मक कारवाई केली जाते. संबंधित तिकीट धारक नेमक्या कोणत्या गाडीसाठी आला आहे, हे ओळखणे शक्य नाही. त्यामुळे एखादी गाडी विलंबाने आली तरी संबंधितांना नवीन तिकीट घेणे गरजेचे आहे. - मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारीपुणे विभाग, मध्य रेल्वे----------

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpune railway stationपुणे रेल्वे स्थानक