कायद्याच्या विद्यार्थ्यांना चुकीचे पदवी प्रमाणपत्र
By Admin | Updated: February 15, 2017 02:32 IST2017-02-15T02:32:42+5:302017-02-15T02:32:42+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न एसएसएमएस विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चुकीच्या पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले

कायद्याच्या विद्यार्थ्यांना चुकीचे पदवी प्रमाणपत्र
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न एसएसएमएस विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चुकीच्या पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी समोर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून तीव्रसंताप व्यक्त केला जात आहे.
विद्यापीठाच्या सूचनेनुसार संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन केले जाते. त्यानुसार मंगळवारी एसएसएमएस विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मात्र, तीन वर्षांची एलएलबी पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बीएसएल प्रमाणपत्रे, तर पाच वर्षांची बीएसएल पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना एलएलबी पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.