शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र चुकीचे : एम. के. रणजितसिंह; वसुंधरा सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:55 IST

किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही : दीपक आपटे महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही : मारुती चितमपल्ली

पुणे : ‘पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र निर्माण होणे चुकीचे आहे. सांस्कृतिक, पुरातत्त्व संवर्धनाप्रमाणे पर्यावरणसंवर्धनाची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयापासून व्हायला हवी. निसर्गसंवर्धनावर आपला सामाजिक-आर्थिक विकास,  अन्नसुरक्षा अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. यात प्रशासन आणि राजकीय घटकांची महत्त्वाची भूमिका आहे. राजकारणी लोकांचे फक्त पुढच्या निवडणुकीकडे लक्ष असते, हे बदलायला हवे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक एम. के. रणजितसिंह यांनी मार्मिक टिपण्णी केली.किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचे संवर्धन प्रणालीचे उत्कृष्ट नेतृत्व एम. के. रणजितसिंह यांना वसुंधरा सन्मान, पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांना इको जनार्लिस्ट, बी. एन. एस. एस. इंडियाचे अध्यक्ष डॉ. दीपक आपटे यांना ग्रीन टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आले.दीपक आपटे म्हणाले, ‘‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही होत आहे. मात्र, तेथील पर्यावरणऱ्हासाकडे दुर्लक्ष होत आहे.‘‘जमिनीच्या तुलनेत समुद्राखाली वावरणे हे खूपच कठीण आहे, हे त्यातले एक महत्वाचे कारण. पण, पर्यावरणऱ्हासाचे उत्तर सागरातच आहे, हे विसरून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनाचा संबंध विज्ञानाशी नसून, राजकीय इच्छाशक्तीशी आहे.’’या वेळी आरती किर्लोस्कर, आर. आर. देशपांडे, माधव चंद्रचूड आदी मान्यवर उपस्थित होते. 

महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वन्यजीवनाबद्दल सखोल अभ्यास होताना दिसत नाही. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये पाहण्यासाठी जाताना व्याघ्रदर्शन घडले पाहिजे, असा पर्यटकांचा आग्रह असतो. पर्यटन व्यवसाय करणारे लोकही वाघ दिसेल, अशी जाहिरात करतात. रस्त्यांच्या कडेला बोअरवेल घेऊन तेथील टाक्या पाण्याने भरल्या जातात. जंगलात मात्र जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था नसते. अशा वेळी प्राण्यांना तिथे येण्याशिवाय पर्याय राहत नाही. हा प्रकार थांबायला हवा.- मारुती चितमपल्ली

टॅग्स :Puneपुणे