पैलवान वल्लभ शिंदेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:09 IST2021-03-25T04:09:53+5:302021-03-25T04:09:53+5:30

पुणे येथील मामासाहेब कुस्ती संकुलात राज्यस्तरीय सब ज्युनिअर फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने फ्री स्टाइल ...

Wrestler Vallabh Shinde selected for National Wrestling Championship | पैलवान वल्लभ शिंदेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पैलवान वल्लभ शिंदेची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पुणे येथील मामासाहेब कुस्ती संकुलात राज्यस्तरीय सब ज्युनिअर फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने फ्री स्टाइल व ग्रिकोरोमन निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ८० किलो वजन गटात वेल्हे तालुक्यातील विंझर येथील पैलवान वल्लभ सुरेश शिंदे यांने प्रथम क्रमांक मिळविला असून उपविजेता अक्षय पाटील ठरला आहे. त्यामुळे नोएडा उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिंदेची निवड झाली आहे. माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, विंझरचे सरपंच विनायक लिम्हण, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल गायकवाड, अंकुश दसवडकर, सामाजिक कार्यकर्ते बापू आखाडे, वस्ताद प्रमोद शिंदे, संग्राम दसवडकर, पृथ्वीराज दसवडकर यांनी अभिनंदन केले.

--

फोटो क्रमांक : २४ वेल्हे तालुक्यातील

फोटो ओळी : मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल (पुणे) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला वल्लभ शिंदे याला गौरविताना माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, सरपंच विनायक लिम्हण, माजी सदस्य अमोल गायकवाड, वस्ताद प्रमोद शिंदे.

Web Title: Wrestler Vallabh Shinde selected for National Wrestling Championship