बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी

By Admin | Updated: May 10, 2017 03:58 IST2017-05-10T03:58:21+5:302017-05-10T03:58:21+5:30

जुन्नर तालुक्यात बिबट्याने खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दबा धरून हल्ले करण्यास सुरुवात केली असून, हिवरे खुर्द, येंधे

Wounded in Leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : जुन्नर तालुक्यात बिबट्याने खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दबा धरून हल्ले करण्यास सुरुवात केली असून, हिवरे खुर्द, येंधे मळा येथे सोमवारी (दि.८) दुपारी ४ वाजता उसाला पाणी देत असताना भिकाजी विश्राम येंधे (वय ६५) यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला करत त्यांना जखमी केले.
भिकाजी यांनी प्रसंगावधान राखत न घाबरता हातातील खोरे खालीवर करून बिबट्याचा हल्ला परतविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करत हातातील खोऱ्याच्या सहायाने बिबट्याचा प्रतिकार करून त्याला पळविले. त्या झटापटीत त्यांच्या हातावर, मांडीवर, पोटरीवर वाघाने पंजे मारले. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रत उपचार करून विषसंरक्षक लस देण्यासाठी भोसरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बालंबाल बचावले.

Web Title: Wounded in Leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.