भीमाशंकर कारखान्याच्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्यांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:10 IST2021-03-22T04:10:40+5:302021-03-22T04:10:40+5:30
या कार्यक्रमास पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, ...

भीमाशंकर कारखान्याच्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्यांचे पूजन
या कार्यक्रमास पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, दगडू शिंदे, शांताराम हिंगे, आण्णासाहेब पडवळ, भगवान बोऱ्हाडे, तानाजी जंबुकर, ज्ञानेश्वर अस्वारे, तज्ञ संचालक किसनराव उंडे, यशवंत वाहतूक संस्थेचे अध्यक्ष गणपतराव इंदोरे, पांडुरंग सैद, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, प्रोसेस मॅनेजर किशोर तिजारे, सचिव रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे तसेच अधिकारी व कर्मचारी हजर होते.
गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरामधील आजअखेर १३५ दिवसांत ७ लाख ३६ हजार ३१० मे.टन उसाचे गाळप करुन सरासरी १०.९७ टक्के साखरउताऱ्याने ८ लाख १ हजार १११ पोती साखर उत्पादन केले आहे. कारखाना सहवीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे आजअखेर १३८ दिवसांत ५ कोटी ३४ लाख ८ हजार २४० युनिट उत्पादन करून कारखानावापर वजा जाता ३ कोटी १५ लाख २ हजार ८८० युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे. कारखान्याचा २१ वा गळीत हंगाम चालू असून कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ऊसउत्पादक शेतकऱ्यांना उच्चतम ऊसदर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
दत्तात्रयनगर पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्यांचे पूजन करताना कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, अॅड. प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी.