‘पिफ’मध्ये महायुद्धांचा थरार

By Admin | Updated: December 13, 2014 23:53 IST2014-12-13T23:53:11+5:302014-12-13T23:53:11+5:30

जागतिक बदलांची नांदी ठरलेल्या घटनांची संवेदनशीलपणो नोंद घेतलेले चित्रपट यंदाच्या 13 व्या पुणो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

World war in PIF's thunder | ‘पिफ’मध्ये महायुद्धांचा थरार

‘पिफ’मध्ये महायुद्धांचा थरार

पुणो :  पहिल्या महायुद्धाचे शताब्दी वर्ष आणि बर्लीनची भिंत जमीनदोस्त होण्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष याची दखल घेत अशा जागतिक बदलांची नांदी ठरलेल्या घटनांची संवेदनशीलपणो नोंद घेतलेले चित्रपट यंदाच्या 13 व्या पुणो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पुणो फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने दि. 8 ते 15 जानेवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, यंदाच्या वर्षी पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही महोत्सव होणार आहे. 
महायुद्धांच्या विध्वंसात आणि परस्पर द्वेषात माणसाची जी मने होरपळली गेली, बर्लिनची अभेद्य भिंत पाडण्यामागचे सामथ्र्य याच मनांचे जुळणो होते. या विलक्षण प्रवासाची नोंद विविध जागतिक चित्रपटांनी घेतली. यंदाच्या महोत्सवाची संकल्पना  ‘जागतिक शांततेचा संदेश व मानवता अधोरेखित करणो’ हीच आहे. या संकल्पनेवर आधारित 75 पेक्षा अधिक देशातील, तसेच 13 विविध विभागांतील 2क्क् पेक्षा अधिक चित्रपट रसिकांना पाहता येणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण, एनएफएआयच्या संचालिका अल्पना संत, तसेच सतीश आळेकर, समीर नखाते आदी उपस्थित होते. 
आंतरराष्ट्रीय आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग, फोक्सव्ॉगन इंटरनॅशनल स्टुडंट फिल्म-स्पर्धात्मक विभाग (लाईव्ह अॅक्शन अँंड अॅनिमेशन), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ लघुपट स्पर्धा (नैसर्गिक वारसा, मानवनिर्मित वारसा, महाराष्ट्राची संस्कृती), ग्लोबल सिनेमा, देश विदेश (कंट्री फोकस), वॉर अगेंस्ट वॉर, ट्रिबुट, विभिन्न देशांतील लक्षणीय चित्रपटांचा-कॅलिडोस्कोप आदींचा समावेशही महोत्सवात आहे. (प्रतिनिधी)
 
पिंपरी-चिंचवडही उतरले
4पिफचे आयोजन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला असून, चिंचवड मधील बिग सिनेमा याठिकाणी खास दोन स्क्रिनवर 7क् चित्रपटांचे दररोज पाच शो दाखविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त राजीव जाधव यांनी दिली. 
 
पुरस्कार रकमेत वाढ करा
4पिफ हा राज्य शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. मात्र, शासनाच्या वतीने देण्यात येणा:या प्रभात आणि संत तुकाराम पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाला करण्यात आली असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.

 

Web Title: World war in PIF's thunder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.