हि-यांची झळाळती दुनिया अवतरणार

By Admin | Updated: January 16, 2015 23:51 IST2015-01-16T23:51:00+5:302015-01-16T23:51:00+5:30

हि-यांच्या झळाळत्या दुनियेत सैर करत लखलख चंदेरी तेजाची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांच्या ‘इंट्रिया’ प्रदर्शनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे

The world of theirs is going to rise | हि-यांची झळाळती दुनिया अवतरणार

हि-यांची झळाळती दुनिया अवतरणार

पुणे : हि-यांच्या झळाळत्या दुनियेत सैर करत लखलख चंदेरी तेजाची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांच्या ‘इंट्रिया’ प्रदर्शनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. डोळे दिपवणाऱ्या झळाळीच्या हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुणेकरांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. १० व ११ जानेवारी रोजी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ताज विवांता (ब्ल्यू डायमंड) येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रख्यात डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व हिरे व्यापारी हर्निश सेठ यांच्या हिरेजडित दागिन्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कलेक्शन येथे बघायला मिळणार आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ‘लोकमत मीडिया प्रा. लि.’चे चेअरमन विजय दर्डा या वेळी उपस्थित राहणार आहेत. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे असे हिऱ्यांचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातील नावीन्यपूर्ण अशा डिझाइन्स व रचनाकौशल्य मनाचा ठाव घेणारे आहे. अन्यत्र कोठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनामध्ये हिरेजडित कर्णफुले, अंगठ्या, कंठहार, कफलिंग्ज आणि अद्वितीय असे ब्रायडल सेट्स यांचा समावेश असणार आहे. व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन दागिन्यांची रचना करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टीवेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात येणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरातील नामांकित उद्योजक, शिक्षणसंस्थांचे प्रमुख, व्यावसायिक आदी अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वाखाणले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The world of theirs is going to rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.