शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
11
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जागतिक चिमणी दिन :  चिमणी अन्न-पाणी, आसऱ्याच्या शोधात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 11:47 IST

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने होत आहे कमी

ठळक मुद्देशहरीकरणाचा बसतोय फटका 

पुणे : माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी म्हणून आपण चिमणीला ओळखतो. पण सध्या शहरात ही चिमणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. या चिमण्यांची संख्या वाढवायची, तर त्यांना आसरा, अन्न, पाणी देणे आवश्यक आहे. २० मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जात आहे. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. चिमणी कीटक, धान्य, ज्वारी, तांदूळ, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खाते. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून चिमणी घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधते. महात्मा फुले मंडईत चिमण्यांची संख्या बऱ्यापैकी दिसून येते. येथे भाजीपाला विक्रेत्यांच्या आजूबाजूला चिमण्या सतत चिवचिव करतात. परंतु, काही वर्षांपूर्वी दिसणाऱ्या चिमण्यांची संख्याही कमी झाल्याचे येथील विक्रेते सांगतात. याच मंडईतील चिमण्यांची संख्या वाढावी आणि त्यांना आसरा मिळावा म्हणून पक्षिप्रेमी लोकेश बापट यांनी नुकतेच तिथे घरटी बनवून लावली आहेत. तसेच घरटी बांधण्यासाठी जे आवश्यक साहित्य असते, ते देखील तिथे ठेवले आहे. या चिमण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून मातीची भांडी ठेवली आहेत. ===================शहरातील प्रत्येकाने आपल्या घराशेजारी चिमण्यांसाठी आसरा, अन्न आणि पाण्याची सोय करून ठेवली पाहिजे; तरच त्यांची संख्या वाढेल. सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला खूप छान वाटते. त्यामुळे असा आवाज ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्यासाठी आम्ही आमच्या घराशेजारीच मातीच्या भांड्यात पाणी आणि सभोवती अन्न ठेवतो. आज चिमण्यांसोबतच अनेक पक्षी येथे येत आहेत. - लोकेश बापट, पक्षिप्रेमी ===========================गावात वाढ, शहरात कमी अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण गावांत संख्या चांगली आहे. शहरात आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्न न मिळणे, पाणवठे नसणे, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. परंतु, यंदाच्या पक्षीगणनेत तिची वाढ झाल्याचे दिसून आले. पण ही वाढ शहरांमध्ये झालेली नाही. ============

टॅग्स :Puneपुणेbirds sanctuaryपक्षी अभयारण्यpollutionप्रदूषण