शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक परिचारिका दिन : वृद्धाश्रमांना जाणवतीये परिचारिकांची चणचण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:38 IST

मुले परदेशात आहेत. घरी सांभाळायला कुणी नाही. मुलींची लग्न झाली आहेत. एकटेपणाने ग्रासलयं. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांशिवाय पर्याय उरलेला नाही.

पुणे : मुले परदेशात आहेत. घरी सांभाळायला कुणी नाही. मुलींची लग्न झाली आहेत. एकटेपणाने ग्रासलयं. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांशिवाय पर्याय उरलेला नाही. मात्र वृद्धाश्रमांमध्ये आजारी ज्येष्ठांकडे लक्ष देण्यासाठी परिचारिकाचं सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठांचा सांभाळ करायचा कसा? असा प्रश्न वृद्धाश्रम चालकांना भेडसावू लागला आहे. वृद्धाश्रमांना परिचारिकांची चणचण भासत असल्यामुळे   परिचारिकांअभावी अंथरूणाला खिळलेल्या ज्येष्ठांना घरी पाठविण्याची वेळ येत आहे किंवा कर्मचा-यांनाच त्यांची सेवा सुश्रृषा करावी लागत आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पाल्य आई-वडिलांचा सांभाळ करण्यास असमर्थता दर्शवित असल्याने वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुलींची लग्ने झाल्यामुळे किंवा सहचारी अथवा सहचारिणीचे निधन झाल्याने घरात एकटयाने राहाण्यापेक्षा अनेक ज्येष्ठांनी वृद्धाश्रमाचा मार्ग निवडला आहे. मात्र वृद्धाश्रमात ज्येष्ठांची संख्या वाढली असली तरी त्यातुलनेत त्यांचा सांभाळ करणा-या परिचारिकांचा तुटवडा भासत आहे. अनेक ज्येष्ठांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे.  काही अंथरूणाला खिळलेले आहेत. या अवस्थेमध्ये तीन ज्येष्ठांमागे एक तरी परिचारिका असणे आवश्यक आहे . मात्र वृद्धाश्रमांना परिचारिका मिळणचं अवघड झालं आहे. नर्सेस ब्युरोकडून किंवा रूग्णालयाकडून परिचारिकांसाठी मागणी केली जाते. मात्र ती मागणी क्वचितच पूर्ण केली जाते. यातच परिचारिकेला एका दिवसाचे हजार ते दीड हजार रूपये द्यावे लागत असल्याने ही रक्कम परवडत नसल्याचे काही वृद्धाश्रम चालकांकडून सांगण्यात आले आहे. 

डॉ. श्रेया उपासनी, आजोळ वृद्धाश्रम, कात्रज :वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी परिचारिकांची गरज भासतेच. पण त्या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अंथरूणाला खिळलेले ज्येष्ठ नागरिक आम्हाला नाकारावे लागतात.

सुमन टिळेकर, अध्यक्ष महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन :परिचर्य संशोधन विकास संस्था स्थापन करून त्यामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्याची आमची इच्छा होती. परिचारिकाच वृद्धाश्रम सांभाळतील अशी ती संकल्पना होती. मात्र आम्हाला त्यासाठी जागा मिळाली नाही. परिचारिकांची संख्याच कमी आहे. रिक्त जागा भरल्या जात नाहीत. मग कुठून पुरवठा करणार?

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर