शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्व संमेलन’ लाडके अन् ‘अखिल भारतीय’ मात्र दोडके..!

By श्रीकिशन काळे | Updated: January 23, 2025 18:28 IST

मराठी संमेलनासाठी दुजाभाव का ?, अनिवासी भारतीयांचा अनुदानाला नकार

पुणे : एकीकडे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील महिन्यात होत आहे, त्याला रेल्वेसाठी तिप्पट दर आकारला आहे. तर दुसरीकडे मात्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे होऊ घातलेल्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनासाठी परदेशातून येणाऱ्या मराठी व्यक्तींना ७५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. सरकारकडून असा दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सरकारचे अनुदान परदेशी मराठी लोकांनी स्वीकारू नये, असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले.

दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाणाऱ्यांसाठी रेल्वे तिकिटातही सूट देण्यात आलेली नसताना ‘विश्व मराठी संमेलना’साठी परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठीजनांना तब्बल ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. दोन्ही संमेलनांचे स्वतंत्र उद्देश असले, तरी मराठी हा समान धागा असताना सरकारी पातळीवरील या विरोधाभासाची साहित्य वर्तुळात चर्चा आहे. दुसरीकडे, अमेरिकेतीलच मराठीजनांनी करदात्यांच्या पैशांतून मिळणारे हे अनुदान नाकारण्याची भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान विश्व मराठी संमेलन घेण्यात येत आहे. त्यासाठी परदेशी मराठी लोकांना आमंत्रण दिले आहे. तसेच संमेलनाला येणाऱ्या परदेशी मराठी लोकांना प्रवास खर्चापोटी प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे. खरंतर परदेशी व्यक्तींना सरकारकडे अनुदान देण्याची मागणी केली नव्हती. तरी देखील सरकारकडून अनुदान जाहीर केले.

-----------------------------

‘विश्व मराठी संमेलनांसाठी कोणीही अनुदानाची मागणी केली नव्हती. तरी राज्य सरकार प्रत्येकी ७५ हजार रुपये देते. पण परदेशातील काही मंडळी दर वर्षी ते पैसे घेत नाहीत. स्वीकारू नये असेही आवाहन करतात. तरी देखील महाराष्ट्र सरकार ते पैसे देतच राहते. दुसरीकडे, मात्र दिल्लीतील संमेलनासाठी केंद्र सरकार रेल्वे प्रवासात सवलत द्यायला तयार नाही. असा दुजाभाव सरकारच्या प्रतिमेला बाधा आणणारा आहे. - श्रीपाद भालचंद्र जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष

...म्हणून अनुदान देतो !काही दिवसांपूर्वी पुण्यात मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की, परदेशातील व्यक्ती विश्व संमेलनाला येतात. ते महाराष्ट्राचेच असतात. त्यामुळे त्यांनी या संमेलनात सहभागी व्हावे, म्हणून त्यांना अनुदान दिले जाते.’’अनुदान घेऊ नका !महाराष्ट्र सरकार विश्व संमेलनाला येणाऱ्यांना अनुदान देणार आहे. पण ते घेऊ नये असे आवाहन कॅलिफोर्नियामधील मराठी भाषक अभय पाटील यांनी केले. पाटील यांच्या पत्राची बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद पानवलकर यांनी देखील दखल घेतली. त्यांनी पाठिंबा दिला. ती रक्कम इतर चांगल्या कामासाठी द्यावी, असेही त्यांनी सूचवले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठी