शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

जागतिक वेश्या व्यवसाय विरोधी दिन विशेष : वेश्या व्यवसायातील नवीन भरती रोखणारा 'पुणे पॅटर्न'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 13:26 IST

पुण्यातील बुधवार पेठ हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे 'रेड लाईट' क्षेत्र आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलींची तस्करी पूर्णपणे थांबविण्यात पोलिसांना यश लॉकडाऊनच्या काळात हा वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंदअनेक महिला आता वेगळा व्यवसाय शोधण्याच्या तयारीत

पुणे : पुणे शहरातील बुधवार, शुक्रवार पेठ ही पूर्वापार कुंटणखान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशभरातूनच नाही तर अगदी बांगला देशातूनही अल्पवयीन मुलींची फसवणूक करुन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते. भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या या मध्य वस्तीतील रेड लाईट एरियात अल्पवयीन तसेच नव्याने कोणी येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी एक उपक्रम राबविला होता. त्यातून या ठिकाणी येणाऱ्या अल्पवयीन मुलींची तस्करी पूर्णपणे थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

          आता त्याचा प्रसार इतरत्रही होऊ लागला आहे. दोन तीन वर्षापूर्वी सुहास बावचे हे परिमंडळ एकचे उपायुक्त असताना त्यांनी हा उपक्रम सुरु केला. बुधवार व शुक्रवार पेठेत साधारण ७०० कुंटणखाने असून सुमारे ३ हजार महिला देहविक्रय करतात. या सर्व महिलांचे सर्व्हेक्षण पोलिसांनी केले. त्यांची संपूर्ण माहिती, आधार कार्ड, फोटो असे रजिस्टर बनविण्यात आले. पोलीस नियमितपणे या कुंटणखान्यात जाऊन तपासणी करत असत. तसेच त्या ठिकाणी कोणी नवीन महिला, अल्पवयीन मुली आली आहे का हे तपासत. याचवेळी या परिसरात गंमत म्हणून रात्री अपरात्री फिरायला येणारे, तरुणींची टिंगल टवाळी करणाऱ्यांची मोठी संख्या असते. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी दररोज रात्री या भागात नाकाबंदी सुरु केली. त्याचा परिणाम येथे निष्कारण भटकणाऱ्यांची संख्या कमी झाली.  तसेच अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसाय ढकलण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले.त्याचबरोबर एखादी मुलगी येथे आली तर तिची माहिती पोलिसांना मिळू लागली.            लॉकडाऊनच्या काळात हा वेश्या व्यवसाय पूर्णपणे बंद होता. तेव्हा पोलीस सोशल सर्व्हिसच्या माध्यमातून या महिलांना पोलिसांनी उपजिविकेसाठी रेशन पुरविले होते. येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या संख्येतही आता घट झाली आहे. अनेक महिला आता वेगळा व्यवसाय शोधण्याच्या तयारीत आहेत..........

वेश्या व्यवसाय करणाऱ्यांवर पिठा अंतर्गत कारवाई केली जाते. सामाजिक संस्थांची मदत घेऊन या महिलांचे समुपदेशन, जनजागृती आणि कारवाई अशा तीन स्तरावर पोलीस कार्यरत असतात. शहराच्या इतर भागातही चालणाऱ्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांची नजर असून त्यांच्यावर कारवाई केली जात असते. अशा व्यवसायातील महिलेवर देशात प्रथमच मोक्का कारवाई पुणे पोलिसांनी केली होती. अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, ........रेड लाईट एरियात वेश्या व्यवसायात नवीन तरुणी, महिला विशेषत: अल्पवयीन मुली ढकलल्या जाऊ नयेत, म्हणून उपक्रम सुरु करण्यात आला होता. त्याला चांगले यश मिळून जवळपास ५० टक्के वेश्या व्यवसाय कमी झाला आहे. सुहास बावचे, पोलीस उपायुक्त......पुणे पोलिसांनी सुरु केलेला हा उपक्रम लॉकडाऊनच्या काळात बंद झाला होता. आता शहरातील व्यवसाय सुरळीत होत आहे. आता पुन्हा हा उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायbudhwar pethबुधवार पेठsex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिस