विशेष बाल पोलिस पथकातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:47+5:302020-11-26T04:27:47+5:30
पुणे : राज्य शासन, महिला बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष ...

विशेष बाल पोलिस पथकातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
पुणे : राज्य शासन, महिला बाल विकास विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने मंगळवार( 24 नोव्हेंबर) पुणे पोलिस कमिशनर कार्यालय येथे पुणे शहरातील 30 पोलिस स्टेशन मधील विशेष बाल पोलिस पथकातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. .
या कार्यशाळेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख , सहाय्यक आयुक्त आय सी पी एस मनीषा बिरारीस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी 50 पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत जुव्हेंनाइल जस्टीस केअर अँड प्रोटेक्शन ऍक्ट 2015 व विशेष बाल पोलिस पथकाची भूमिका या विषयावर परम आनंद, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी तसेच दत्तक संस्था व बालगृहतील मुलांच्या प्रवेशाबाबत विशेष बालपोलिस पथकाची भूमिका यावर सगुणा फरांदे प्रोग्रॅम डायरेक्टर भारतीय समाज सेवा केंद्र तर दत्तक संस्थेतील व बालगृहतील मुलांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया यावर शर्मिला सय्यद - प्रमुख प्रशासकीय अधिकारी सोफोश यांनी मार्गदर्शन केले.
सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष बाल पोलीस पथक शब्बीर सय्यद व बाल संरक्षण अधिकारी कविता थोरात यांनी नियोजन केले. शर्मिला सय्यद यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.