कामगारांना चाकूचा धाक दाखवत लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:10 IST2021-04-13T04:10:27+5:302021-04-13T04:10:27+5:30
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव शामदेव राय (रा. किंदरपट्टी, उत्तरप्रदेश, सध्या रा. जुन्या तलावामागे, निसर्ग रेसीडेन्सी बारामती) यांनी ...

कामगारांना चाकूचा धाक दाखवत लुटले
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुराव शामदेव राय (रा. किंदरपट्टी, उत्तरप्रदेश, सध्या रा. जुन्या तलावामागे, निसर्ग रेसीडेन्सी बारामती) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी गेल्या सात वर्षांपासून बारामतीत सेन्ट्रींग काम करतात. शनिवारी (दि. १०) लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने घरीच होते. पत्र्याच्या शेडमध्ये उकडत असल्याने ते शेजारी निलगिरीच्या झाडाखाली बसले होते. दुपारी एकच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी युवकांनी या मजूरांकडे पैशाची मागणी केली.चौघांचे मोबाईल काढून घेतले. फिर्यादीचा मोबाईल जवळ ठेवत अन्य तिघांचे साधे फोन माघारी दिले. सगळ्यांचे खिसे तपासत जबरीने १२०० रुपयांची रक्कम काढून घेत मारहाण केली. फिर्यादीने ही बाब बाब ठेकेदारांना कळवत त्यांना बोलावून घेत या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली.
————————————————