शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासह आत्मदहनाचा कामगारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 00:38 IST

डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ट्रॅन्टर इंडिया या कारखान्यातील १७ कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांचे १०० दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही सहा दिवस आमरण उपोषणास बसले असूनही कामगारांना न्याय मिळत नाही.

कोरेगाव भीमा - डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील ट्रॅन्टर इंडिया या कारखान्यातील १७ कामगारांना कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ कामगारांचे १०० दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही सहा दिवस आमरण उपोषणास बसले असूनही कामगारांना न्याय मिळत नाही. दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास कुटुंबासह अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा उपोषणास बसलेल्या कामगारांनी दिला.या कारखान्यात १७ ते २२ वर्षांपासून काम करणाऱ्या १७ कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता १ डिसेंबरपासून कामावरून काढल्यामुळे गेले १०० दिवस हे कामगार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन, साखळी उपोषण करीत असून कारखाना व्यवस्थापन कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने कामगारांच्या साखळी उपोषणास आता पत्नी-मुलांसह गेल्या काही दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ बसले होते. १०० दिवसांच्या साखळी उपोषणानंतरही कारखाना व्यवस्थापनाने कोणताही तोडगा न काढल्याने १७ कामगार आमरण उपोषणाला बसलेले आहेत. यावेळी उपोषणास बसलेल्या कामगारांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले, की कारखान्यात गेली १७ ते २२ वर्षे काम करीत असताना २५० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे व अनेक सन्मानचिन्हे देत उत्कृष्ट कामगार पुरस्काराने कारखाना व्यवस्थापनाने गौरवूनही आम्हाला अचानक कारखान्यातून कोणतीही चूक नसताना काढण्यात आले आहे. कारखाना व्यवस्थापन १०६ दिवसांत आमच्याकडे फिरकलेसुद्धा नाही. उलट पोलिसांमार्फत दबाव आणले जात आहेत. आम्हाला लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणाही सहकार्य करीत नसल्याने आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलांसह सोमवारी आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी कामगारांनी देतानाच यास जबाबदार म्हणून मॅनेजिंग डायरेक्टर गणेश गोपाल, व्हाईस प्रेसिडेंट शिरोज नांबियार, एचआर वेदप्रकाश तिवारी, लोकेश मंत्री यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, दत्तात्रय येळवंडे, रमेश सातपुते, अविनाश वाडेकर, गणेश जाधव, राजाराम शिंदे, नवनाथ यनभर, भाऊ रोकडे, नवनाथ गव्हाणे, राजू दरेकर आदी उपस्थित होते.परिसरातील कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येत व्यवस्थापनाच्या भूमिकेचा निषेध केला. दरम्यान, याबाबत कारखाना व्यवस्थापनाचे अधिकारी वेदप्रकाश तिवारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Puneपुणे